हिंगणीत पीक स्पर्धा तंत्रज्ञान मेळावा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:27+5:302021-03-18T04:19:27+5:30
कोपरगाव : कृषी विभागाकडून राज्यभरात रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथे धनराज ...
कोपरगाव : कृषी विभागाकडून राज्यभरात रब्बी हंगाम पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील हिंगणी येथे धनराज पवार यांच्या वस्तीवर गहू पीक कापणी व मळणी संदर्भात तंत्रज्ञान मेळावा मंगळवारी (दि. १६) घेण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला कृषी अधिकारी मनोज सोनवणे, मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन, सरपंच अश्विनी पवार, उपसरपंच आशा चंदनशिव, पोलीसपाटील कुमार पवार, मच्छिंद्र कुदळे, रामभाऊ पवार, रतन भवर, हिराबाई माळी, बाळासाहेब पवार, मनसुख पवार, भानुदास पवार, सुनील पवार, धर्माचंदनशीव गांगुर्डे, पांडुरंग कुदळे, किरण दहे, कृषी पर्यवेक्षक सी. बी. डरांगे, कृषी सहाय्यक नीलेश बिबवे, विजय कौर, तुषार वसईकर, संदीप पवार आदी उपस्थित होते. कृषी सहाय्यक नीलेश बिबवे यांनी प्रास्ताविक केले तर धनराज पवार यांनी आभार मानले.