घोडेबाजाराला लगाम

By Admin | Published: May 13, 2016 11:57 PM2016-05-13T23:57:20+5:302016-05-13T23:59:54+5:30

अहमदनगर : येत्या नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या आठ नगरपालिकांच्या निवडणुका सरकारच्या नवीन निर्णयानुसार होणार आहेत़ त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या घोडेबाजाराला चाप बसणार आहे़

Hinge | घोडेबाजाराला लगाम

घोडेबाजाराला लगाम

अहमदनगर : येत्या नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या आठ नगरपालिकांच्या निवडणुका सरकारच्या नवीन निर्णयानुसार होणार आहेत़ त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या घोडेबाजाराला चाप बसणार आहे़ तसेच जनतेत लोकप्रिय असणाऱ्यांची लॉटरी लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे़
नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ नगरपालिका व महापालिकेतही पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग पध्दत अस्तित्त्वात येणार आहे़ येत्या दिवाळीत संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, राहाता श्रीरामपूर, राहुरी, देवळाली प्रवरा आणि पाथर्डी नगरपालिकेची निवडणूक होत आहे़ या निवडणुका २०११ च्या जनगणनेनुसार करण्यासाठी नव्याने प्रभाग रचनेचे आदेश प्रशासनास प्राप्त झाले आहेत़ सरकारने पुन्हा बहुसदस्यीय पध्दत लागू केली आहे़ प्रभाग रचना, सदस्य पदाचे आरक्षण, नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया जूनपासून सुरू होणार आहे़ सर्वाधिक पैसा खर्चण्याची क्षमता असलेल्यांनाच महापौर व नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळत होता़ नव्या निर्णयामुळे मातब्बरांनी धक्का बसला आहे़

Web Title: Hinge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.