हिंगणगाव बंधारा ओव्हर फलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:06 PM2017-09-28T12:06:20+5:302017-09-28T12:06:20+5:30

निंबळक : हिंगणगाव (ता. नगर) येथील बंधारा अलिकडे झालेल्या पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे शेतकºयांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, बंधाºयातील पाणी मुख्य रस्त्यावरील पुलावर साचल्यामुळे विद्यार्थी व नगरला जाणाºयांची गैरसोय होत आहे. महिन्यापासून हा मुख्य रस्ता पाण्यामुळे बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जखणगाव मार्गे जावे लागते.

hingngoan,tank,water,over,flow, | हिंगणगाव बंधारा ओव्हर फलो !

हिंगणगाव बंधारा ओव्हर फलो !

ंगणगाव बंधारा ओव्हर फलो ! निंबळक : हिंगणगाव (ता. नगर) येथील बंधारा अलिकडे झालेल्या पावसामुळे ओव्हर फ्लो झाला आहे. त्यामुळे शेतकºयांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. दरम्यान, बंधाºयातील पाणी मुख्य रस्त्यावरील पुलावर साचल्यामुळे विद्यार्थी व नगरला जाणाºयांची गैरसोय होत आहे. महिन्यापासून हा मुख्य रस्ता पाण्यामुळे बंद झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जखणगाव मार्गे जावे लागते. जलयुक्त शिवाराच्या कामामुळे जलसाठ्याची किमया झाली आहे. या पुलावरून हिंगणगावमधून नगरला जाणारे कामगार व शालेय विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पुलावर कंबरे इतके पाणी साचले आहे. विद्यार्थ्यांना जखणगाव मार्गे जाण्यासाठी तीन ते चार कि.मी. अंतराची पायपीट करावी लागते. यामध्ये त्यांचा वेळेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होतो. पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. बंधारे दोन्ही बाजूने पूर्ण क्षमतेने भरले आहे. जोपर्यत बंधाºयामध्ये पाणी आहे तोपर्यंत किमान तीन ते चार महिने नागरिकांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.

Web Title: hingngoan,tank,water,over,flow,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.