अहमदनगरच्या विशाल गणेश मंदिराचा इतिहास जगासमोर येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 02:53 PM2020-02-26T14:53:50+5:302020-02-26T14:55:12+5:30
नगरमधील अनेक मंदिरे व देवस्थाने पुरातन आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास व आख्यायिका आहेत. परंतु याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन वस्तुनिष्ठ व विश्वसनीय साधनांचे आधारे प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी शोध निबंधाद्वारे इतिहास जगासमोर मांडला आहे. त्यामुळे श्री विशाल गणेश मंदिराचा इतिहास व त्याची सत्यता या शोध निबंधाद्वारे जगासमोर येणार आहे.
अहमदनगर : नगरमधील अनेक मंदिरे व देवस्थाने पुरातन आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास व आख्यायिका आहेत. परंतु याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन वस्तुनिष्ठ व विश्वसनीय साधनांचे आधारे प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी शोध निबंधाद्वारे इतिहास जगासमोर मांडला आहे. त्यामुळे श्री विशाल गणेश मंदिराचा इतिहास व त्याची सत्यता या शोध निबंधाद्वारे जगासमोर येणार आहे.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शैक्षणिक संस्थेतील इतिहास संशोधक प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी श्री विशाल गणेश मंदिराचा शोध निबंध सादर केला. याबद्दल देवस्थानच्यावतीने त्यांचा अध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. नवनाथ वाव्हळ म्हणाले, बीड येथे मंदिर व मूर्ती शास्त्रातील राष्ट्रीय परिषदेत सादर केल्या गेलेल्या शोध निबंधात नगर शहरातील विविध मंदिरे व देवस्थान या विषयीचा वस्तुनिष्ठ व विश्वसनीय अभ्यास केला. त्यातील बारकावे शोधून शोध निबंध सादर केला आहे. यामुळे श्री विशाल गणेश मंदिराचा इतिहास मांडण्याचा अल्पसा प्रयत्न याद्वारे केला आहे. हा शोध निबंध ‘दृष्टिकोन’ या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यताप्राप्त जर्नलमध्ये छापला गेला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक कानडे यांनी केले तर आभार पंडित खरपुडे यांनी मानले.
यावेळी आगरकर म्हणाले, वाव्हळ यांनी मोठ्या परिश्रमाने शोधनिबंध सादर केला आहे. यामुळे विशाल गणपती मंदिराचा महिमा जगभर जाण्यास मदत होईल.