Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:37 PM2024-11-27T12:37:29+5:302024-11-27T12:41:23+5:30

Ahilya Nagar Hit and Run Video: अहिल्यानगर शहरात हिट अॅण्ड रनची घटना घडली आहे. कारचालकाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चौघांच्या अंगावर कार घातली.

Hit and Run Video: Car driver crushed four people in Ahilyanagar, the incident was caught on CCTV  | Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 

Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 

Video of Ahilyanagar Hit and Run: चौकात उभ्या असलेल्या चौघांसह समोरून येणाऱ्या वाहनांना उडवतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अहिल्यानगर भागातील असून, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरोपी मद्य प्राशन करून कार चालवत होता, अशी माहिती समोर आली आहे. 

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात ही घटना घडली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चालकाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांना उडवले.

अहिल्यानगरमधील मार्केट यार्डजवळ असलेल्या महात्मा फुले चौकाजवळ हा प्रकार घडला. पांढर्‍या रंगाच्या कारने उभ्या असलेल्या लोकांना उडवले. त्यानंतर चालकाने कार पुढे नेली आणि समोरून येणाऱ्या वाहनांना धडक दिली. या घटनेत तिघे जखमी झाले असून, एकाचा मृत्यू झाला आहे. 

कोतवाली पोलिसांनी कारचालक राजू विठ्ठल खांदवे (रा. सांडवे, ता.जिल्हा. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. या अपघातात रविंद्र कानडे (रा. कानडे मळा) यांचा मृत्यू झाला. रोहित मांजरे, जय जाधव, आसाराम शिंदे हे तिघे जखमी झाले. 

 

तिघेही महात्मा फुले चौकात एका पानटपरीजवळ उभे होते. घटनेनंतर परिसरातील नागरिकांना तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. अपघाताची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कारचालकाला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Hit and Run Video: Car driver crushed four people in Ahilyanagar, the incident was caught on CCTV 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.