कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी होगानसचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:21 AM2021-04-28T04:21:40+5:302021-04-28T04:21:40+5:30

होगानस इंडिया या कंपनीच्या वतीने व नवजीवन प्रतिष्ठान यांच्या समन्वयाने निंबळक येथील अनामप्रेम कोविड सेंटरला ३० गाद्या, ३० बेड, ...

Hogan's initiative to help corona patients | कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी होगानसचा पुढाकार

कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी होगानसचा पुढाकार

होगानस इंडिया या कंपनीच्या वतीने व नवजीवन प्रतिष्ठान यांच्या समन्वयाने निंबळक येथील अनामप्रेम कोविड सेंटरला ३० गाद्या, ३० बेड, चिचोंडी पाटील येथील शासकीय कोविड सेंटरला ३० गाद्या ३० बेड, बुऱ्हाणनगर येथील कोविड सेंटरला कोविड प्रतिबंधात्मक साहित्य तसेच एमआयडीसीमधील ॲडोर कोविड सेंटरला १० गाद्या व १० बेड असे साहित्य पुरविले आहे. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे सहसंचालक स्वप्नील देशमुख यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. हा लोकार्पण सोहळा होगानस इंडियाचे संचालक डॉ. शरद मगर, एच.आर. मॅनेजर सुभाष तोडकर, प्रोजेक्ट हेड शिरीष देवरे, नवजीवनचे राजेंद्र पवार, संपत रोहोकले, स्नायडर ग्रुपचे एच.आर. मॅनेजर चैतन्य खानविलकर, एच. आर. हेड श्रीकांत गाडे, ग्लोबलचे संचालक सचिन ठोसर यांच्या उपस्थितीत झाला.

देशमुख म्हणाले, एमआयडीसीतील कंपन्यांमधील एच. आर. लीडर व सुरक्षा अधिकारी यांनी स्थापन केलेल्या मार्ग असोसिएशनच्या माध्यमातून कामगार, वाहतूकदार व छोटे व्यावसायिक यांच्यासाठी ॲडोर वेल्डिंग लिमिटेड येथे ऑक्सिजन बेडची सुविधा असलेले कोविड सेंटर उभारण्यात येणार असून या सेंटरमध्ये चहा, नाश्ता, जेवण मोफत असणार आहे.

राजेंद्र पवार म्हणाले, मार्ग असोसिएशन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका तसेच अहमदनगर सोशल फेडरेशन या स्वयंसेवी संस्थांची संघटना तसेच केटरिंग असोसिएशन व प्रहार संघटना व लोकसहभागातून सुमारे दीड लाखांपेक्षा जास्त गरजवंतांना जेवण, किराणा, औषधे, जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात आल्या आहेत. सर्वांनी एकत्र येऊन समन्वयाने काम केल्यास आपण कोरोनावर नक्कीच मात करू, असे सांगून पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

Web Title: Hogan's initiative to help corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.