नगरमध्ये मुस्लिम समाजातर्फे चीनच्या राष्ट्रपतींच्या प्रतिमेसह चायना मालाची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 02:37 PM2020-06-17T14:37:03+5:302020-06-17T14:38:04+5:30
चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. याच्या निषेधार्थ बुधवारी भिंगार येथील मुस्लिम समाजाच्या वतीने चीनचे राष्ट्रपती शी-जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी चायना मालाची होळी करुन या मालावर बहिष्काराची घोषणा करण्यात आली.
अहमदनगर : चीनच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. याच्या निषेधार्थ बुधवारी भिंगार येथील मुस्लिम समाजाच्या वतीने चीनचे राष्ट्रपती शी-जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी चायना मालाची होळी करुन या मालावर बहिष्काराची घोषणा करण्यात आली.
यावेळी मतीन सय्यद म्हणाले, चीन हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक कुरापती करुन भारत देशात अशांतता पसरविण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. चायना मालावर देशवासियांनी बहिष्कार टाकल्यास चीनला मोठा फटका बसणार आहे. कोरोनाचे संकट देखील या देशाने जगाला दिले आहे. चीनला सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन धडा शिकवण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भिंगारमध्ये चायना माल विकू देणार, घेणार नसल्याचे स्पष्ट करुन, नागरिकांना चायना मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले.
आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे जिल्हा शहर संघटक मतीन सय्यद, शहानवाझ काझी, रफिक बेग, आसिफ शेख, शहेबाज शेख, नईम शेख, लियाकत शेख, अख्तार सय्यद, अॅड.सलमान सय्यद, इब्राहिम सय्यद, जकेरिया कुरेशी, सफाद जमादार आदी उपस्थित होते.