नेवासेत चिनी वस्तूंची होळी, शहर भाजपचे आंदोलन,निषेधाच्या घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 07:36 PM2020-06-18T19:36:14+5:302020-06-18T19:36:24+5:30
नेवासा : चीनच्या सैैन्याने लडाखमध्ये भारतीय जवानांवर केलेल्या क्रूर हल्ल्याचा शहर भाजपच्या वतीने गुरुवारी सायंकाळी चीनचा प्रतिकात्मक पुतळा तसेच चिनी वस्तूंची होळी करून निषेध नोंदविण्यात आला. चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शहरातील गणपती मंदिर चौकात शहर भाजपच्या वतीने चीनच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस निरंजन डहाळे यांनी चीनचा माल मोठ्या प्रमाणात भारतात विकला जातो व त्याच पैैशाचा भारताविरोधात वापर करत असल्याची टीका केली. त्यामुळे चीनमधील वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहराध्यक्ष मनोज पारखे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सतीश मुळे यांनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात सतीश गायके, ज्ञानेश्वर टेकाळे, अजितसिंग नरूला, प्रतीक शेजुळ, मनोज डहाळे, दत्तात्रय गीते, सुशांत पारखे, राजेश उपाध्ये,विठ्ठल मैंदाड,बाळासाहेब गरुड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
--------
फोटो -नेवासे शहर भाजपने चिनी वस्तूंची होळी करत निषेधाच्या घोषणा दिल्या व भारतीय शहिद जवांना श्रद्धांजली वाहिली.