पोलीस बंदोबस्तात पेटली मढी येथील होळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:38+5:302021-03-29T04:15:38+5:30

तिसगाव : कान्होबा देवस्थान समिती, पोलीस, महसूल प्रशासन अशा तिहेरी समन्वयाने श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गोपाळ समाजाची ...

Holi at Petli Madhi under police protection | पोलीस बंदोबस्तात पेटली मढी येथील होळी

पोलीस बंदोबस्तात पेटली मढी येथील होळी

तिसगाव : कान्होबा देवस्थान समिती, पोलीस, महसूल प्रशासन अशा तिहेरी समन्वयाने श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे गोपाळ समाजाची मानाची होळी रविवारी ५ वाजता बंदोबस्तात पेटली.

दत्त मंदिराजवळील होळी पेटविण्याची मूळ जागा बदलून गोपाळ समाजाच्या पारावर होळी घ्यावी, अशा काहींच्या अट्टाहासामुळे किरकोळ तणाव झाला होता. तहसीलदार श्याम वाडकर, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतल्याने तणाव निवळला. त्यानंतर मुख्य मानकरी माणिकराव लोणारे, हरिदास काळापहाड, हरिभाऊ हंबीरराव, नामदेव माळी, पुंडलिक नवघरे, सुंदर गिऱ्हे, रघुनाथ काळापहाड आदींना कडे करून पोलीस बंदोबस्तात कानिफनाथ गडावर नेण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष राधाकिसन मरकड व विश्वस्थांच्या हस्ते मानकऱ्यांना गोवऱ्या देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ओळखीसाठी सत्काराचे हार तसेच गळ्यात ठेवून मानकऱ्यांना मिरवणुकीने दत्त मंदिर परिसरातील साखर बारवेजवळ आणण्यात आले. ५ वाजता देवस्थान समितीने दिलेल्या व भाविकांनी आणलेल्या गोवऱ्या गोलाकार रचण्यात आल्या. विधिवत अग्निपूजा, महाआरती करून कानिफनाथांच्या जयघोषात होळी पेटविण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर, कुस्तीगीर संघटनेचे कार्यवाह झेंडू पवार, आकाश पवार, दिलीप पवार, विश्वस्त श्यामराव मरकड, भाऊसाहेब मरकड, डॉ. विलास मढीकर, रवींद्र आरोळे, डॉ. रमाकांत मडकर, बाबासाहेब मरकड, भानुविलास मरकड आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तलाठी, आरोग्य विभागाचे पथक सकाळपासूनच मढी येथे तळ ठोकून होते. देवस्थान समितीने तपासणी सक्तीची केली होती. त्यामुळे बघ्यांनी काढता पाय घेतला.

--

२८ मढी होळी

मढी येथील होळी गोपाळ समाजातील मानकऱ्यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी पाच वाजता पोलीस बंदोबस्तात पेटविण्यात आली.

Web Title: Holi at Petli Madhi under police protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.