साई संस्थानच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:24 AM2021-01-16T04:24:01+5:302021-01-16T04:24:01+5:30
संस्थानचे भक्तनिवास विभागातील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी दत्तात्रय बिरदोडे, संदीप गायकवाड हे साईआश्रम स्वागतकक्ष परिसरात स्वच्छता करत असताना त्यांना दोन ...
संस्थानचे भक्तनिवास विभागातील कंत्राटी स्वच्छता कर्मचारी दत्तात्रय बिरदोडे, संदीप गायकवाड हे साईआश्रम स्वागतकक्ष परिसरात स्वच्छता करत असताना त्यांना दोन तोळ्यांची सोनसाखळी सापडली. त्यांनी ती प्रामाणिकपणे साईआश्रम कार्यालयात जमा केली. दुसऱ्या दिवशी ज्या भाविकांची साखळी हरविली होती ते शोध घेण्यासाठी आले असता त्यांना ओळख पटवून ही साखळी परत देण्यात आली. हरविलेली सोन्याची चेन पुन्हा मिळण्याची शक्यता धूसर असताना ती मिळाल्याने या भाविकाचा चेहरा खुलला.
प्रामाणिकपणे सोनसाखळी परत देणारे स्वच्छता कर्मचारी दत्तात्रय बिरदोडे, संदीप गायकवाड यांचा भक्तनिवासचे अधीक्षक पुंजाहारी कोते, सुमित कंपनीचे व्यवस्थापक बापूसाहेब चिंधे, साईभक्त वेणुगोपाल, पी. रत्नमा, पर्यवेक्षक प्रकाश वाणी, अशोक कोते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी प्रसाद भातोडे, प्रसाद गोंदकर, प्रवीण धनवटे, सागर बच्छे, दिगंबर दराडी उपस्थित होते.