परमेश्वर ढगे यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:27 AM2020-12-30T04:27:11+5:302020-12-30T04:27:11+5:30
शेवगाव : जोहरापूरचे सुपुत्र प्रा. परमेश्वर ढगे यांनी ‘ढोरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जलसिंचनाचा पीक पद्धतीवर होणारा परिणाम’ या विषयावर ...
शेवगाव : जोहरापूरचे सुपुत्र प्रा. परमेश्वर ढगे यांनी ‘ढोरा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जलसिंचनाचा पीक पद्धतीवर होणारा परिणाम’ या विषयावर शोधप्रबंध सादर केल्यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा नांदेड विद्यापीठाकडून त्यांना पीएच.डी. ही बहुमानाची पदवी प्रदान करण्यात आली. त्यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला.
यासाठी त्यांना डॉ. डी. जी. माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल ढगे यांचे ज्येष्ठ नेते दिलीप लांडे, देवीदास म्हस्के, यश फाउंडेशनचे अध्यक्ष संजय डोंगरे, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप बामदळे, प्रदीप काळे, दादासाहेब दळवी, दिनकर बडधे, प्रा. मोहनराव बडधे, प्रा. डाॅ. अण्णासाहेब काकडे, दिलीप गर्जे आदींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी विठ्ठल उगलमुगले, सुभाष लांडे, गंगा खेडकर, राजेंद्र उगलमुगले, माजी सरपंच अशोक देवढे, दादा देवढे, सुरेश पंडित, जनार्दन ढगे, बापूसाहेब पानसंबळ, नितीन लांडे, अशोक पंडित आदी उपस्थित होते.
फोटो : २८ परमेश्वर ढगे
प्रा. परमेश्वर ढगे यांचा जोहरापूर येथे ग्रामस्थांनी सत्कार केला.