नगरमध्ये सावित्रीच्या लेकींचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:18 AM2021-01-04T04:18:55+5:302021-01-04T04:18:55+5:30

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने वैद्यकीय व ...

Honoring Savitri's Lekki in the town | नगरमध्ये सावित्रीच्या लेकींचा सन्मान

नगरमध्ये सावित्रीच्या लेकींचा सन्मान

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या वतीने वैद्यकीय व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अंजली आव्हाड, संतोष ढाकणे, संजय सपकाळ, मळू गाडळकर, संभाजी पवार, दीपक खेडकर, अमित खामकर, भरत गारुडकर, साहेबान जहागीरदार, मतीन शेख, प्रा. प्रशांत म्हस्के, शहानवाज शेख, प्रकाश कराळे, खंडू काळे, नीलेश इंगळे, गणेश बोरुडे आदी उपस्थित होते.

आयुर्वेद महाविद्यालयात सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये कार्य केलेल्या डॉ. ए. ए. देशमुख, डॉ. पी. एस. जगताप, डॉ. एम. व्ही. देशमुख, डॉ. पी. एस. नलगे, डॉ. व्ही. के. वाघे, डॉ. यू. एस. पाटील, डॉ. आर. व्ही. म्हसे, डॉ. ए. पी. पवार यांचा तसेच दामोदर विधाते (मास्तर) प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षिका शोभा गिते, सविता सोनवणे, शोभा गाडगे, लता म्हस्के, सारिका गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला.

................

सावित्रीबाईंनी दिली महिलांना दिशा

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या व भारताच्या प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी करून दिली. आज सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. सावित्रीबाईंनी महिलांना जगण्याची दिशा दिली. त्यांच्यामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती करत असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले.

..................

०३ सावित्रीबाई ॲनिव्हर्सरी

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माणिक विधाते, सुरेश बनसोडे, अंजली आव्हाड, संतोष ढाकणे, संजय सपकाळ आदी. (छाया - साजीद शेख - नगर)

Web Title: Honoring Savitri's Lekki in the town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.