'आशा'दायी निर्णय : १ जुलैपासून मानधनातही होणार वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:14 AM2021-06-30T04:14:32+5:302021-06-30T04:14:32+5:30

नगर तालुक्यातील २५१ 'आशा'ताईंना मिळणार स्मार्टफोन केडगाव : कोरोनाच्या संकटकाळात मोलाची कामगिरी करणाऱ्या आशासेविकांच्या मानधनात १ जुलैपासुन दीड हजार ...

'Hopeful' decision: From July 1, there will be an increase in honorarium | 'आशा'दायी निर्णय : १ जुलैपासून मानधनातही होणार वाढ

'आशा'दायी निर्णय : १ जुलैपासून मानधनातही होणार वाढ

नगर तालुक्यातील २५१ 'आशा'ताईंना मिळणार स्मार्टफोन

केडगाव : कोरोनाच्या संकटकाळात मोलाची कामगिरी करणाऱ्या आशासेविकांच्या मानधनात १ जुलैपासुन दीड हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे, तसेच माहिती अद्ययावत करण्यासाठी या सेविकांना राज्य सरकारच्या वतीने स्मार्टफोनही देण्यात येणार आहे. राज्यातील ६८ हजार २९७ आशासेविकांसह ३ हजार ५७० प्रवर्तक गटांना हा लाभ मिळणार आहे.

कोरोनाच्या कठीण काळात आशासेविकांनी आरोग्य विभाग व सर्वसामान्य जनता यांच्यातील दुवा म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हे, गावोगावी नागरिकांची आरोग्य तपासणी आदी महत्त्वपूर्ण कामे आशासेविका यांनी केली आहेत. त्यांच्या या कामांची राज्य सरकारने दखल घेत १ जुलैपासून त्यांना अचूक संकलन व सादरीकरणासाठी १ हजार रुपये निश्चित वाढ आणि ५०० रुपये कोविड भत्ता मिळणार आहे. तसेच आशासेविकांना विशेष भेट म्हणून स्मार्टफोन देण्यात येणार आहे. नगर तालुक्यातील २५१ आशासेविकांना याचा लाभ मिळणार आहे.

---------------------

नगर तालुक्यात २५१ आशासेविका कार्यरत आहेत. कोरोनाच्या कठीण काळात त्यांचे मोठे सहकार्य मिळाले. या सर्वांना सतत कोणती ना कोणती माहिती ऑनलाइन भरावी लागते . त्यामुळे त्यांना स्मार्टफोन मिळावेत असा प्रस्ताव होता. शासनाने तो मंजूर केला आहे.

डॉ. ज्योती मांडगे-गाडे, तालुका आरोग्य अधिकारी

-----------------

आम्हाला सतत ऑनलाइन अहवाल भरावा लागतो. कोरोनामुळे ऑनलाइन कामे खूप वाढली. यामुळे आम्हाला स्मार्टफोन मिळावा, अशी आमची मागणी होती. सर्व्हे अहवाल, मासिक अहवाल, आरोग्य तपासणी अहवाल ऑनलाइन भरावा लागतो. तसेच नवनवीन ॲप येतात त्यामुळे आम्हाला स्मार्टफोनची गरज होती.

- शीतल कुटे, आशासेविका

Web Title: 'Hopeful' decision: From July 1, there will be an increase in honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.