टाकळी कडेवडी शिवारात घोडचा कालवा फुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 02:07 PM2019-09-17T14:07:39+5:302019-09-17T14:08:27+5:30
घोडचा कालवा टाकळी कडेवळीत शिवारात किलोेमीटर क्रमांक ५७ मध्ये अज्ञात व्यक्तींनी फोडला. त्यामुळे ५ ते ६ क्युसेक पाणी वाया गेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.
श्रीगोंदा : घोडचा कालवा टाकळी कडेवळीत शिवारात किलोेमीटर क्रमांक ५७ मध्ये अज्ञात व्यक्तींनी फोडला. त्यामुळे ५ ते ६ क्युसेक पाणी वाया गेले. ही घटना सोमवारी पहाटे घडली.
घटना घडल्यानंतर जलसंपदा विभागातील एन.व्ही.नवले, ए.एन.गिरमे यांनी कालव्या फोडल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दहा दिवसापूर्वी श्रीगोंदा फॅक्टरी जवळ कालवा फोडण्यात आला होता. त्यानंतर कालवा फोडीची दुसरी घटना घडली आहे. घोड ओव्हरफ्लो झाल्याने आवर्तन सोडले होते. श्रीगोंदा तालुक्यात पाऊस नसल्याने पाटपाणी महत्वाचे ठरत आहे. पण कालवा फोडीमुळे घोडचे पाणी वाया जात आहे. यामुळे लाभार्थी शेतक-यांचा तोटा होत आहे. त्यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.
घोड कालवा फुटला आहे. यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. शेतक-यांना पाणी मिळावे म्हणून कालवा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल, असे कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी सांगितले.