संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यासह बोकड फस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 03:48 PM2018-05-18T15:48:28+5:302018-05-18T15:48:45+5:30

संगमनेर तालुक्यातील प्रतापूर येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या व एक बोकड ठार झाले.

Horses with two goats in a leopard attack in Sangamner taluka | संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यासह बोकड फस्त

संगमनेर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यासह बोकड फस्त

आश्वी : संगमनेर तालुक्यातील प्रतापूर येथे शुक्रवारी पहाटे बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या व एक बोकड ठार झाले. प्रतापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतक-याचे पशुधन फस्त करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रामभाऊ बाबुराव आंधळे यांच्या चारही बाजूंनी संरक्षक जाळी असलेल्या गट नंबर ३६ मधील गोठ्यात बिबट्याने शेळ्या व बोकडावर हल्ला करून ठार मारले. या वेळी गोठ्यातील इतर जनावरे सैरभैर होऊन ओरडू लागल्याने रामभाऊ आंधळे गोठ्याकडे गेले असता बिबट्याने तेथून धूम ठोकली.

Web Title: Horses with two goats in a leopard attack in Sangamner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.