संगमनेर शहरात हॉटस्पॉट हटले; दोन दुकानांना ठोकले सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 05:03 PM2020-05-26T17:03:04+5:302020-05-26T17:03:55+5:30
संगमनेर : शहर तसेच तालुक्यातील धांदरफळ बुद्रूक व कुरण येथे हॉटस्पॉट हटल्यानंतर मंगळवारी बहुतांशी दुकाने सुरू झाली. नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. यामुळे अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाले. दरम्यान, प्रशासनाच्या वतीने दोन दुकानांना सील ठोकण्यात आले आहे.

कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी शनिवारी (९ मे) संगमनेरात येत २३ मे पर्यंत हॉटस्पॉट जाहिर केला होता. हॉटस्पॉट हटविल्यानंतर सगळीकडे एकदम गर्दी होईल. त्यामुळे पुढील तीन दिवस शहरातील दुकाने बंद ठेवावीत, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली होती. व्यापारी संघटनांनी याला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर मंगळवारी शहर व परिसरातील बहुतांशी दुकाने उघडण्यात आली.
फिजिकल डिस्टन्सींग, दुकानांमध्ये सॅनिटायझर नसणे आदी कारणांमुळे शहरातील नवीन नगर रस्त्यावरील इलेक्ट्रीकल दुकान, मोबाईल शॉपी ही दोन दुकाने सील करण्यात आली. नियमांचे उल्लंघन होत असलेली दुकाने सील करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सांगितले.