पोरगं इथ येवून बोलतच कसं ? : बाळासाहेब थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 05:49 PM2019-03-05T17:49:41+5:302019-03-05T18:06:03+5:30

मध्यंतरी लोणीचे सुजय विखे पाटील निमोणला येवून गेले. त्यांची भाषण झाली. आईसाहेब सुद्धा बरोबर आल्या होत्या. भाषणाचा कार्यक्रम झाला.

How come you talked to me? : Balasaheb Thorat | पोरगं इथ येवून बोलतच कसं ? : बाळासाहेब थोरात

पोरगं इथ येवून बोलतच कसं ? : बाळासाहेब थोरात

तळेगाव दिघे : मध्यंतरी लोणीचे सुजय विखे पाटील निमोणला येवून गेले. त्यांची भाषण झाली. आईसाहेब सुद्धा बरोबर आल्या होत्या. भाषणाचा कार्यक्रम झाला. त्यादिवसाची व आश्वीची टीका आपण गेल्या ३५ वर्षात ऐकली नाही. ते इथं आल्यावर म्हसणवाट्यात स्फुरण येणारी काही मंडळी आहे. खालच्या पातळीच भाषण ही संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही. काँग्रेस पक्षाच्या सर्वोच बॉडीचा मी सदस्य आहे. पोरगं इथ येवून बोलतच कसं ? अशी टीका करत माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी डॉ. सुजय विखे यांचा समाचार घेतला. संगमनेर तालुक्यातील निमोण येथे विकास कामांचे भूमिपूजन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाजीराव खेमनर होते.
आमदार थोरात म्हणाले, निळवंडे कामाला आपण गती दिली. माजीमंत्री मधुकर पिचड साहेब सोडता याकामी कुणीही मदत केली नाही. ५०० कोटी रुपये साईबाबा संस्थानने दिले. त्यास स्थगिती मिळाली. आपण जे करतो, प्रामाणिकपणे करतो. जे पाणी आहे, ते सगळ्यांना वाटून घ्यावे लागेल. आपल्या संस्था चांगल्या चालल्या. उसाला २५०० रुपये एफआरपी दिला. विकास पाहवत नसल्याने त्यांची भणभण वाढली. विंचू चावल्यावर विंचू चढवायचा कार्यक्रम सुरु आहे. चांगले ते मोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. काँग्रेस पक्षाच्या सर्वोच बॉडीचा मी सदस्य आहे. पोरंग इथ येवून कसं बोलतं ? खालच्या पातळीच भाषण ही संगमनेर तालुक्याची संस्कृती नाही. पुढील काळात जिल्ह्यातील वडिलधा-यांना हे ऐकायची वेळ येवू नये. आपली संभ्रमावस्था दूरू करण्यासाठी आपण आलो आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघात आमदारकी सोडता सर्व संस्थासाठी आपलं मतदान तिथं आहे. त्यांना वाटत आपण २८ गावात जायचं नाही. सुख-दुखात जायचं नाही, मग केव्हा जायचं ? आपण बांधलेल्या शाळा इमारतींचे उद्घाटने त्यांनी केले. आपण चुकीचे काही केले नाही. आपण कुणाच्या अन्नात माती कालवण्याचे काम केले नाही.
आमदार डॉ. तांबे म्हणाले, काहीजण पक्षात राहूनही विरोध करतात. त्यांनी आपली पात्रता तपासून पाहिली पाहिजे. युवक नेत्याने सुधारणा करून घ्यावी. सत्ता बदलली की पक्ष बदलायचा, सत्तेच्याजवळ राहायचे अशी यांचे धोरण आहे. प्रास्ताविक साहेबराव आंधळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. अनिल घुगे यांनी आभार मानले.
आमदार डॉ. सुधीर तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, नगराध्यक्षा दुगार्ताई तांबे, लक्ष्मण कुटे, शिवाजी थोरात, बी.आर. चकोर, इंद्रजित थोरात उपस्थित होते.

Web Title: How come you talked to me? : Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.