सौंदाळे येथील मुलीचा असा करण्यात आला खून, शवविच्छेदन अहवालातून पुष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 06:06 PM2020-06-22T18:06:39+5:302020-06-22T18:06:48+5:30
नेवासा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. नेवासे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
नेवासा (जि. अहमदनगर) : तालुक्यातील सौंदाळा येथील वैष्णवी सोमनाथ आरगडे या अल्पवयीन मुलीचा गळा दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. नेवासे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
हवालदार भीमराव पवार यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात वैष्णवी आरगडे (वय ९) हिला उपचारासाठी सोमवारी नेण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. नेवासे पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. मयत वैष्णवी हिचा चुलता कानिफनाथ विठ्ठल आरगडे यांनी सर्पदंशाने तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. मात्र ग्रामीण रुग्णालयाच्या वैैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत्यूबाबत संशय व्यक्त केला. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी पंचनामा केल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशावरून मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला होता. तेथील डॉक्टरांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालात वैैष्णवी हिचा मृत्यू श्वसनलिकेवर दबाव आल्याने व श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानंतर प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. नेवासा पोलिसांनी अज्ञात व्यक्तिविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. २० ते २१ जून दरम्यान रात्री अज्ञात इसमाने श्वास दाबून वैैष्णवी हिचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जिल्हा पोलीस प्रमुख अखिलेश कुमार सिंग यांनी रविवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपाली काळे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रणजित डेरे,उपनिरीक्षक भरत दाते प्रकरणाची चौकशी करत आहेत. मयत वैष्णवीच्या जवळील नातेवाइकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक रणजित डेरे तपास करत आहेत.