आजपासून बारावीची परीक्षा
By Admin | Published: February 17, 2016 10:37 PM2016-02-17T22:37:56+5:302016-02-17T22:42:17+5:30
अहमदनगर : बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील ८२ केंद्रांवर ६० हजार ९०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील ८२ केंद्रांवर ६० हजार ९०५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत़ पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने ही परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जय्यत तयारी केली आहे़
नगर शहरात बारावीच्या परीक्षेचे ११ केंद्र आहेत़ सकाळी ११ ते २ असा परीक्षेचा वेळ आहे़ बारावीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा असल्याने शिक्षण विभागाचे सर्व केंद्रांवर बारीक लक्ष राहणार आहे़
परीक्षा केंद्राच्या ठिकाणी झेरॉक्स, फॅक्स, स्कॅनिंग मशीन व इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवता येणार नाहीत़ तसेच परीक्षा केंद्रात परीक्षार्थी, नेमणुकीस असलेले शिक्षक व अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही़ परीक्षेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये, यासाठी तालुकास्तरावर बैठे पथक तैनात करण्यात आले असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) लक्ष्मण पोले यांनी सांगितले़
(प्रतिनिधी)