नगरमध्ये रात्री भरते हुडहुडी; दिवसा फुटतो घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:05 PM2017-10-27T13:05:58+5:302017-10-27T13:09:33+5:30

अहमदनगर : आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यभरात सर्वात कमी तापमान अहमदनगरमध्ये नोंदविले गेले आहे. सलग दोन दिवस ...

Huddhudi fills night in town; Sweat during the day | नगरमध्ये रात्री भरते हुडहुडी; दिवसा फुटतो घाम

नगरमध्ये रात्री भरते हुडहुडी; दिवसा फुटतो घाम

अहमदनगर : आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यभरात सर्वात कमी तापमान अहमदनगरमध्ये नोंदविले गेले आहे. सलग दोन दिवस नगरमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली आहे. रात्री पारा एकदम घसरत असून, दिवसा पारा चढत आहे. दिवसा ३३ अंश सेल्सिअसपर्यंत चढलेला पारा एकदम १२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरत आहे. त्यामुळे नगरमध्ये रात्री हुडहुडी भरत आहे तर दिवसा घाम फुटत आहे.
यंदा नगर जिल्ह्यात पावसाने विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे जिल्हाभरातील नद्या-धरणे तुडुंब भरले आहेत. गेल्या आठवड्यापासून राज्यभरात थंडीची चाहूल लागली आहे. नगरकर थंडीने चांगलेच गारठले आहेत. बुधवारी नगरचे तापमान १२.३ अंश सेल्सिअस नोंदविले. तर गुरुवारी १२.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. त्याखालोखाल नाशिकमध्ये १४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले आहे. त्यानंतर उस्मानाबाद १४.३, यवतमाळमध्ये १५.४ तर मालेगाव १६.५ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले आहे. गेल्या वर्षीही नगर जिल्ह्यात निचांकी तापमानाने विक्रम प्रस्थापित केला होता. त्यानंतर हिवाळ््याच्या सुरुवातीला राज्यभरातील निचांकी तापमानाची नोंद नगरमध्ये झाली आहे.

Web Title: Huddhudi fills night in town; Sweat during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.