हिवरेबाजार सोसायटीची कर्ज वसूली शंभर टक्के; कुणीही देणेकरी नाही
By सुदाम देशमुख | Published: April 1, 2023 04:04 PM2023-04-01T16:04:38+5:302023-04-01T16:04:48+5:30
१०० टक्के कर्ज भरण्याची परंपरा जोपासणारे हिवरे बाजार एकमेव गाव आहे.
सुदाम देशमुख
अहमदनगर - आदर्श गाव हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची मार्चअखेर शंभर टक्के कर्ज भरण्याची परंपरा यंदा १४ व्या वर्षीही कायम राहिली आहे.
सर्व सभासदानी रक्कम रुपये ३ कोटी ९ लाख ७६ हजार रुपये पिककर्ज भरणा करून कर्जाची परतफेड केली. गेल्या १४ वर्षापासून १०० टक्के कर्ज भरण्याची परंपरा जोपासणारे हिवरे बाजार हे एकमेव गाव आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सभासदांना १४ टक्के लाभांश वाटप करण्यात आले. आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली १०० टक्के वसुलीचे प्रयत्न यशस्वी ठरले. प्रत्येक सभासदाने कर्जाची रक्कम भरून खाते नियमित करून घेतले.
यासाठी सोसायटी सभासदांच्या सहकार्याबरोबरच सोसायटीचे चेअरमन छ्बुराव ठाणगे, व्हा चेअरमन रामभाऊ चत्तर, एस.टी. पादिर, रो.ना.पादिर, अर्जुन पवार, दामोधर ठाणगे, अशोक गोहड ,सहदेव पवार, बाबा गुंजाळ तसेच सोसायटीचे सचिव कुशाभाऊ ठाणगे आदींनी परीश्रम घेतले.