राशीनच्या तरूणांकडून शंभर ऑक्सिजन सिलिंडर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:22 AM2021-04-28T04:22:11+5:302021-04-28T04:22:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क राशीन : सध्या कोरोनाचे थैमान चालू असताना बाधित रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. प्राणवायू न मिळाल्याने ...

Hundreds of oxygen cylinder gifts from Rashin's youth | राशीनच्या तरूणांकडून शंभर ऑक्सिजन सिलिंडर भेट

राशीनच्या तरूणांकडून शंभर ऑक्सिजन सिलिंडर भेट

लोकमत न्यूज नेटवर्क

राशीन : सध्या कोरोनाचे थैमान चालू असताना बाधित रूग्णांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. प्राणवायू न मिळाल्याने कोरोना बाधित रूग्णांवर मृत्यूची वेळ येत आहे. त्यामुळे प्रशासनाची प्रचंड धावपळ सुरु आहे. अशातच राशीनच्या तरूणांनी एक लाखांचा निधी संकलन करून तब्बल शंभर सिलिंडर आरोग्य प्रशासनाला सुपुर्द केले. मॉर्निंग वॉक टीमच्या या कौतुकास्पद कार्याची तालुक्यात चर्चा होत आहे.

कर्जत तालुक्याच्या प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, कर्जत नगर पंचायतचे मुख्य अधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे साहित्य देण्यात आले.

यावेळी मॉर्निंग वॉक टीमचे सदस्य विनोद राऊत, शोएब काझी, सुरेश सायकर, पांडुरंग भंडारे, तात्यासाहेब माने, संदीप सांगडे, मिलिंद रेणुके, माउली कदम, हरिश्चंद्र राऊत, अमोल कुलथे, मुख्याध्यापक राजेंद्र नष्टे, मोईन शेख, अब्बास शेख, भाऊसाहेब पंडीत, मकरंद राऊत, महादेव पंडीत, संदीप राऊत, महेश गवळी, दादा जाधव, पप्पू भिताडे, सुरेश कानगुडे, आप्पा राऊत, राहुल राजेभोसले, मनोज बोरा, संतोष काशिद, सुनील गोसावी, विकी पवळ, अमोल पंडीत, भास्कर मोढळे, धनंजय जगताप, बिभीषण जंजीरे, सोनू कानडे आदी उपस्थित होते. .................

समाजावर आलेल्या संकट काळात मॉर्निंग वॉक टीमने केलेल्या मदतीने अनेक कोरोना रूग्णांना जीवदान मिळणार आहे. अशा आपत्ती काळात प्रशासनाला ग्रुपने केलेली मदत ही लोकचळवळ ठरावी.

-अर्चना नष्टे, प्रांताधिकारी

.........

मॉर्निंग वॉक ग्रुपच्या तरूणांनी एकत्र येत हे उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. तरुणांच्या इतर ग्रुपनेही आदर्श घेऊन सामाजिक कार्यात हातभार लावावा.

-चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक

..........

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना बाधित रूग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनाची प्रचंड धावपळ होत आहे. प्राणवायू न मिळाल्याने अनेक बाधितांचा मृत्यू झाला आहे. या संकल्पनेला माझ्या टीमने सहकार्य केले.

-विनोद राऊत, मॉर्निंग वॉक टीम सदस्य

.....................

२७ कर्जत सिलेंडर

येथील मॉर्निंग वॉक टीमच्या वतीने एक लाख रूपयांचा निधी संकलित करून शंभर ऑक्सिजन सिलिंडर प्रशासनाला दिले. यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव.

Web Title: Hundreds of oxygen cylinder gifts from Rashin's youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.