तनपुरे क ारखान्याच्या कामगारांचे उपोषण सुरूच

By Admin | Published: September 6, 2014 11:57 PM2014-09-06T23:57:02+5:302023-06-29T12:23:06+5:30

राहुरी : चाळीस महिन्यांचे थकीत पगार द्यावेत, या मागणीसाठी राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे तिसऱ्या दिवशीही पुणे येथील साखर आयुक्ताच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू होते़

The hunger strike of the Tanpur area has continued | तनपुरे क ारखान्याच्या कामगारांचे उपोषण सुरूच

तनपुरे क ारखान्याच्या कामगारांचे उपोषण सुरूच

राहुरी : चाळीस महिन्यांचे थकीत पगार द्यावेत, या मागणीसाठी राहुरी येथील डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे तिसऱ्या दिवशीही पुणे येथील साखर आयुक्ताच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू होते़ माजी न्यायमूर्ती बी़ जे़ कोळसे पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मार्गदर्शन केले़
पहिल्या दिवशी तनपुरे साखर कारखान्याच्या संचालकांनी मध्यस्थी करण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी झाला़ त्यानंतर काल व आज आयुक्त कार्यालयातील कुणीही कामगारांच्या आंदोलनाकडे फिरकले नाही़ तिसऱ्या दिवशी भरत पेरणे, बाळासाहेब ढोकणे, गजानन निमसे, भाऊसाहेब तारडे, भाऊसाहेब तांबे, अर्जुन दुशिंग, दिलीप कोहकडे यांनी चक्री उपोषणामध्ये सहभाग घेतला.
अप्पासाहेब गावडे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे़ तनपुरे कारखान्याच्या संचालकांनी दोन पगार देण्यास नकार दिल्याने कामगार संतप्त झाले आहेत़
आता चाळीस पगार घेतल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा कामगारांनी दिला़ आयुक्त कार्यालयातील कुणीही अधिकारी आंदोलनकर्त्यांना भेटले नाही़ त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली़
कोळसे यांनी कामगारांना न्यायालयीन लढाई क रण्याची गरज व्यक्त केली़ माजी संचालक बाळासाहेब चव्हाण यांनी कामगारांना न्याय मिळावा म्हणून न्यायालयीन लढाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The hunger strike of the Tanpur area has continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.