सारोळाबद्दीत दोन गटात तुफान हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 03:46 PM2017-09-24T15:46:31+5:302017-09-24T15:47:52+5:30
चिचोंडी पाटील : जुन्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये लोखंडी पाईप व दगडांचा सर्रास वापर करण्यात आला. ...
चिचोंडी पाटील : जुन्या वादातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये लोखंडी पाईप व दगडांचा सर्रास वापर करण्यात आला. या घटनेत तीनजण जखमी झाले असून यात एका महिलेचा समावेश आहे. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
गणपतीवरुन दोन गटात वाद होते. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा वाद उफाळून आला. रेणुकामाता मंदिरासमोर दोन गट आपसात भिडले व आपसात लोखंडी पाईप व दगडाने जोरदार हाणामारी झाली. यामध्ये सुशीला रावळे, दिनकर रावळे, महेश रावळे, अमोल रावळे हे चौघे जखमी झाले. त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
सुनील रावळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मिठु शेळके, रवींद्र शेळके, बारकु कुटे, बन्सी कराळे, पोपट बनकर, रापेश गव्हाणे, हरिभाऊ कुटे, पोपट शेळके, ज्ञानदेव तोडमल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेलार करीत आहेत