देवळालीजवळील अपघातात पती-पत्नी ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 07:55 PM2020-04-30T19:55:44+5:302020-04-30T19:56:04+5:30
राहुरी : तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्रीरामपूर-राहुरी फॅक्टरी रोडवर मोटरसायकल व चारचाकी वाहनाचा अपघात होऊन पती-पत्नी दोघेजण जागीच ठार झाले. घटना गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी घडली आहे. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत उशीरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. भारत शंकर वाघापुरे (वय ६०) आणि अनिता भारत वाघापूरे (वय ५५, राहणार देवळाली प्रवरा, खटकळी) अशी मृतांची नावे आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

देवळाली प्रवरा येथील खटकळी येथील रहिवासी असलेले पती-पत्नी गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजे दरम्यान बजाज एम एटी (क्रमांक एम. एच. १७ एच. ६२०) या दुचाकीवर बसून राहुरी फॅक्टरी येथे दवाखान्यात जात होते. इरिगेशन बंगल्या समोर चारचाकी वाहन (क्रमांक एम. एच. १७ डी. एक्स. ९७९७) या चारचाकी वाहनाने त्यांना समोरून जोराची धडक दिली. या धडकेने ते १०० फूट लांब फेकले गेले आणि जागेवरच ठार झाले आहेत. तर मोटरसायकलचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
हे पती-पत्नींना राहुरी येथील ग्रामीण रूग्णालयात आणले. यावेळी सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी तपासणी केली. मात्र नेहमी प्रमाणे ग्रामीण रूग्णालयात कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने अपघात झालेल्या पती-पत्नीचा इसीजी काढता आला नाही. त्यामुळे सदर अपघात झालेले दोघे मृत आहेत की जिवंत आहेत, याची माहिती सहाय्यक वैद्यकीय अधिकारी संदिप आठरे यांनी दिली नाही. शहरातील इतर दवाखाने बंद असल्याने उशीरापर्यंत इसीजी करता आला नाही. बराच वेळ मृतदेह ग्रामीण रूग्णालया समोर अॅम्बूलन्समध्ये पडून होते. यावेळी त्यांच्या मुलांनी व नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. यामुळे पुन्हा एकदा राहुरी ग्रामीण रूग्णालयाचा कारभार समोर आला आहे.
--
फोटो- अपघातात ठार झालेल्या पती-पत्नींचे मृतदेह रुग्णवाहिकेमध्येच होते. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासही वेळ लागल्याने नातेवाईकांना ताटकळत बसावे लागले.