वाळवणेत पती-पत्नी सरपंच, उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:20 AM2021-02-10T04:20:13+5:302021-02-10T04:20:13+5:30
सरपंचपदासाठी महिला राखीव असल्याने जयश्री सचिन पठारे यांची निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदासाठी सचिन गुलाबराव पठारे यांना नवनिर्वाचित ...
सरपंचपदासाठी महिला राखीव असल्याने जयश्री सचिन पठारे यांची निवड करण्यात आली, तर उपसरपंचपदासाठी सचिन गुलाबराव पठारे यांना नवनिर्वाचित सदस्यांनी संधी दिली. आमदार नीलेश लंके यांचे समर्थक व वाळवणे येथील भैरवनाथ देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष सचिन पठारे, पारनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रशासकीय मंडळातील सदस्य संचालक सुरेश थोरात यांच्या नेतृत्वाखालील मंडळाने ९ पैकी ९ जागा जिंकून बहुमत मिळवले होते. त्यामुळे सरपंच उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होणार हे नक्की होते. सरपंचपद जयश्री पठारे यांना देण्यावर बैठकीत एकमत झाले होते. नंतरच्या काळात वैचारिक मंथन होऊन उपसरपंचपद सचिन पठारे यांना देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार या दोघांचेच अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
..
०९जयश्री पठारे
..