वाशेरे ग्रामपंचायतीत पती-पत्नी सरपंच, उपसरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:19 AM2021-03-18T04:19:44+5:302021-03-18T04:19:44+5:30
आरक्षण सोडतीमध्ये वाशेरे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. निवडणुकीत गावात अनुसूचित जमातीसाठी ग्रामपंचायत सदस्य राखीव जागा नव्हती. एकही ...
आरक्षण सोडतीमध्ये वाशेरे ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. निवडणुकीत गावात अनुसूचित जमातीसाठी ग्रामपंचायत सदस्य राखीव जागा नव्हती. एकही उमेदवार नसल्याने सरपंच निवडीच्यावेळी पद रिक्त राहिले. तेव्हा उपसरपंचपदी अनिता गजे यांची अविरोध निवड झाली होती.
नंतर फेरआरक्षण काढण्यात आले. ओबीसी व सर्वसाधारण पुरुष चिठ्ठी टाकून सर्वसाधारणसाठी आरक्षण राखीव झाल्याने सोमवारी उपसरपंच अनिता गजे यांचे पती ग्रामपंचायत सदस्य किरण गजे यांची सरपंचपदी अविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य बबन वाकचौरे, मच्छिंद्र पानसरे, स्वाती शेटे, मनीषा वाकचौरे, निवडणूक निर्णय अधिकारी शिवराम डगळे, ग्रामसेविका निलम शिंदे उपस्थित होते. अर्थवेद पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.बी. एम. महाले यांनी पती-पत्नीचा निवडीनंतर सत्कार केला.
..
१७ वाशेरे पती-पती सरपंच
...
ओळी-अकोले तालुक्यातील वाशेरे ग्रामपंचायतीत पती-पतीची सरपंच, उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली.