पत्नीसह प्रियकराला पतीकडून चोप; श्रीगोंदा शहरातील रुग्णालयात राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 03:03 PM2020-06-21T15:03:36+5:302020-06-21T15:04:22+5:30
पत्नीसह प्रियकराला पतीकडून चोप दिल्याची घटना श्रीगोंदा शहरातील एका खासगी रुग्णालयात रविवारी (दि.२१ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रीगोंदा : पत्नीसह प्रियकराला पतीकडून चोप दिल्याची घटना श्रीगोंदा शहरातील एका खासगी रुग्णालयात रविवारी (दि.२१ जून) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
अरुण सानप (रा.चकला, ता.शिरुर कासार, जि. बीड) असे या प्रियकराचे नाव आहे. या घटनेत पतीने सानप याच्यावर चाकूने हल्ला केला. यात सानप हा जखमी झाला आहे.
श्रीगोंदा फॅक्टरीवरील विवाहित महिला श्रीगोंदा शहरातील एका हॉस्पीटलमध्ये परिचारिका म्हणून काम करीत होती. तिचे बीड जिल्ह्यातील अरुण सानप या तरुणाशी सुत जुळले. त्यांचे प्रेम फुलू लागले. त्या महिलेच्या पतीने त्याला अनेक वेळा समज दिली. पत्नीला सुनावले. पण त्यांनी ऐकले नाही. शेवटी रविवारी श्रीगोंद्यातील हॉस्पीटलमध्ये जाऊन पतीने राडा केला. दोघांना चांगलाच चोप दिला. सानप याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियशीच्या पतीविरुध्द श्रीगोंदा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.