पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:14+5:302021-05-03T04:16:14+5:30

कर्जत : पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ...

Husband commits suicide by killing wife | पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

कर्जत : पत्नीच्या डोक्यात कुर्‍हाडीने वार करून तिचा खून केला. त्यानंतर पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे शुक्रवारी (दि.३०) रात्री घडली. घटनेचे कारण समजू शकले नाही.

योगीता राहुल गजरमल, राहुल दिलीप गजरमल (वय ३०, दोघेही रा. कुळधरण, ता. कर्जत) अशी मृतांची नावे आहेत.

कुळधरण येथे राहुल गजरमल हा कुटुंबासह राहतो. शुक्रवारी रात्री त्याने पत्नी योगीता गजरमल हिचा डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर घराजवळच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी समोर आला. घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब यमगर, सुनील माळशिकारे, पोलीसपाटील समीर जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. हा घटनेचे कारण मात्र समजू शकले नाही.

Web Title: Husband commits suicide by killing wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.