पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात गेला; घटनेनं परिसरात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 16:56 IST2025-01-20T16:55:52+5:302025-01-20T16:56:13+5:30
मध्यरात्रीनंतर निहालने प्रियंकाला लाकडाने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला.

पत्नीचा खून करून पती थेट पोलीस ठाण्यात गेला; घटनेनं परिसरात खळबळ
श्रीगोंदा: किरकोळ वादातून पत्नी प्रियंका दिवटे (वय २८) हिची पती निहाल नवनाथ दिवटे याने लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या केली. यानंतर तो श्रीगोंदा पोलिस ठाण्यात शरण आला. ही घटना रविवारी (दि. १९) मध्यरात्री अढीच वाजण्याच्या सुमारास पेडगाव येथील राहत्या घरी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका व निहाल यांच्यात नेहमी भांडणे होत होते. काही वर्षापूर्वी प्रियंकाने निहालच्या विरोधात तक्रार दिली होती. यानंतर मध्यस्थी करण्यात आल्यानंतर प्रियंका पुन्हा सासरी आली होती. शनिवारी संध्याकाळी दोघांचे भांडण झाले. मध्यरात्रीनंतर निहालने प्रियंकाला लाकडाने मारहाण केली. यात तिचा मृत्यू झाला. रविवारी सकाळी निहालने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात येऊन हत्येची कबुली दिली. पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे व पोलिस निरीक्षक किरणकुमार शिंदे तसेच फॉरेन्सिक पथकाने तपासणी केली.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. निहालने हत्या कोणल्या कारणावरून केला हे पोलिस तपासातून निष्पन्न होईल.