मी अजून काँग्रेसमध्येच : शालिनी विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 10:29 AM2019-05-18T10:29:07+5:302019-05-18T10:29:12+5:30

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी भर सभेत भाजपाचा ‘जय श्रीराम’ नाकारला  आहे़

I am still in the Congress: Shalini I | मी अजून काँग्रेसमध्येच : शालिनी विखे 

मी अजून काँग्रेसमध्येच : शालिनी विखे 

अहमदनगर : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असतानाच त्यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांनी भर सभेत भाजपाचा ‘जय श्रीराम’ नाकारला  आहे़ त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे़ 
  अहमदनगर जिल्हा परिषद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे़ विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या पत्नी शालिनी विखे या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत़  जिल्हा परिषदेत भाजप विरोधात होती़ परंतु, लोकसभा निवडणुकीत चिरंजीव डॉ़ सुजय विखे यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला़ निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेची पहिली सभा शुक्रवारी झाली़ या सभेत विखे यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचौरे हे सभागृहात बोलण्यासाठी उभे राहिले़
 ध्वनीक्षेपक हाती घेत त्यांनी अध्यक्षा विखे यांना ‘जय श्रीराम’ केला़ त्यावर विखे यांनी मी अजून काँग्रेसमध्येच आहे,  अशी प्रतिक्रिया दिली़ शालिनी विखे यांचे बंधू जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणेही सभागृहात उपस्थित होते़ त्यांनी लगेच कृपया सभागृहात कुणीही राजकारण आणू नये, असे म्हणत सावरासावर केली़  लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषदेत विखे व वाकचौरे यांच्यात टोकाचा संघर्ष झाला़ पण लोकसभा निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलली़
 अध्यक्षा विखे यांचे चिरंजीव सुजय हे भाजपमध्ये दाखल झाले़ त्यामुळे वाकचौरे यांचा जिल्हा परिषदेतील विरोधही मावळला आहे़ लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या २३ मे रोजी लागेल़ परंतु, त्यापूर्वीच शालिनी विखे यांनी मी काँग्रेसमध्ये असल्याचे भर सभागृहात जाहीर केले आहे़ जिल्हा परिषदेच्या राजकारणावर त्याचा काय परिणाम होतो, ते पाहावे लागेल़

राष्टÑवादी संभ्रमात 
जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे यांचे चिरंजीव डॉ़ सुजय यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीच्या विरोधात लढविली़ निवडणुकीनंतर मी काँग्रेसमध्येच, अशी भूमिका अध्यक्षा शालिनी विखे यांनी सभागृहात जाहीर केल्याने राष्ट्रवादी संभ्रमात पडली आहे़ जिल्हा परिषदेत आगामी काळात काय भूमिका घ्यावी, असा पेच राष्ट्रवादीसमोर आहे़ 

Web Title: I am still in the Congress: Shalini I

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.