मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले- राधाकृष्ण विखे यांचा बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 04:32 PM2020-06-20T16:32:12+5:302020-06-20T16:32:21+5:30

लोणी : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्?या प्रदेशअध्यक्षांना मोतोश्रीच्या दारात जावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात ...

As I left the party, he got the post - Radhakrishna Vikhe's retaliation against Balasaheb Thorat | मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले- राधाकृष्ण विखे यांचा बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार

मी पक्ष सोडला म्हणून त्यांना पद मिळाले- राधाकृष्ण विखे यांचा बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार

लोणी : नेहरु, गांधींचे विचार सोडून कॉंग्रेस पक्षाच्?या प्रदेशअध्यक्षांना मोतोश्रीच्या दारात जावे लागते हीच मोठी शोकांतिका आहे. थोरातांचे पक्षात काय स्थान आहे, याबद्दल न बोललेच बरे. मी पक्ष सोडला म्हणुन त्यांना पद मिळाले. आता मंत्री पद टिकविण्यासाठी त्यांची धडपड आहे. कोण कोणाच्या पाया पडतो हे पाहणारे आ.थोरात मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यात थांबून काय करत होते? भ्रष्टाचाराच्या फाईल काढु नयेत म्हणुन मुख्यमंत्र्यांचे पाय दाबत होते की, भाजप मध्ये घ्या म्हणुन विनवणी करत होते यावरही त्यांनी बोलले पाहिजे, असे आव्हान माजीमंत्री आ.विखे पाटील यांनी दिले.

कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काल केलेल्या वक्तव्याचा आ. विखे पाटील यांनी जोरदार समाचार घेतला. लोणी येथे माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की, प्रदेशअध्यक्षांच्या वक्तव्याला फारसे गांभियार्ने घ्यावे अशी परिस्थिती नाही. त्यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस पक्षाची कशी वाताहत झाली हे महाराष्ट्र पाहतोय, त्यांचे स्वत:चे कर्तृत्व काहीच नाही. यापुर्वी राज्यात अशी परिस्थिती कधीही नव्हती.

सत्तेत सहभाग असलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाला आठ आठ दिवस मुख्यमंत्री भेटीची वेळ देत नाहीत, हेच मोठे दुर्दैव असल्याकडे लक्ष वेधून येवढी लाचारी पत्करुन सत्तेत का राहाता? सत्तेत आम्हाला स्थान राहु द्या, यासाठीच आता मातोश्रीवर वा-या सुरु असल्याची टिका आ. विखे पाटील यांनी केली.


राज्?ाात शेत?री, उद्योजक, विद्यार्थी यांचे मोठ्या प्रमाणात प्रश्?ा निर्माण झाले आहेत. या प्रश्?ाांसाठी मुख्?ामंत्र्यांकडे गेले असते तर सर्वांना आनंद वाटला असता. पण सत्?ोत आम्?ाला घाटा नको वाटा पाहीजे ही स्?ार्थी भूमिका घेवूनच मातोश्रीवरच्?ाा बैठकीचा त्?ाांचा फार्स होता, हे आता लपून राहीलेले नाही. मागील पाच वर्षे त्यांना सभागृहात बोलण्यासही वेळ नव्हता. त्यांच्या मंत्रीपदाच्या  कार्यकाळातील कारभारावर कॅगने ताशेरे ओढले आहेत. भ्रष्टाचाराच्या फाईल बाहेर येवू नयेत यासाठीच ते मागील युती सरकारच्या विरोधात शब्दही काढण्याची हिम्मत दाखवु शकले नसल्याचा थेट आरोप आ.विखे पाटील यांनी केला.
--
महसुल मंत्री असताना मागील कार्यकाळात खासगी सचिव असलेले सेवानिवृत्?ा आधिकारी पुन्?ा थोरातांच्?ाा कार्यालयात कसे दिसतात? त्?ाांनी स्?ेच्?ा निवृत्?ाी घेतली. मागील पाच वर्षे हे अधिकारी घरी बसले होते. आता पुन्?ा मंत्री झाल्यानंतर हेच आधिकारी थोरातांच्या कार्यालयात मागे बसून काय करतात, प्रशासनात चांगले आधिकारी नाहीत का? स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या  आधिका-यांना पुन्हा घेण्याचे गौडबंगाल काय, हे एकदा राज्यातील जनतेला कळु द्या.

 

Web Title: As I left the party, he got the post - Radhakrishna Vikhe's retaliation against Balasaheb Thorat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.