३७ वर्षांनी भेटले जुने मित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:49+5:302021-02-23T04:31:49+5:30
राजूर : येथील सर्वोदय विद्यालयातील १९८३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी पार पडला. ३७ वर्षांनी एकत्र आलेल्या जुन्या वर्गमित्रांनी ...
राजूर : येथील सर्वोदय विद्यालयातील १९८३ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी पार पडला. ३७ वर्षांनी एकत्र आलेल्या जुन्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला.
या वर्गमित्रांनी सेवानिवृत्त झालेले सर्व शिक्षक पाहून त्या काळातील त्यांची शिकविण्याची शैली, त्यांनी केलेल्या शिक्षा यावरही त्यांच्या गप्पा मारल्या. ज्या शिक्षकांमुळे आपण घडलो त्यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त करत त्यांचा मानसन्मान केला.
संस्थेचे दिवंगत सचिव रा. वि.पाटणकर, अध्यक्ष बापूसाहेब शेंडे, कोषाध्यक्षा सावित्रीबाई मदन यांच्या आठवणी जपण्यासाठी दोन सोनचाफ्याची झाडे लावली.
यावेळी माजी प्राचार्य एम.के. बारेकर, श्रीनिवास एलमामे, बी.बी. देशमुख, प्रकाश टाकळकर, माजी मुख्याध्यापक वाय.डी. धुमाळ, टी.के. महाले, भारती महाले, अशोक पवार, डी.डी. साबळे, भरत सावंत, शरद ओहरा, एन.डी. बेल्हेकर या माजी शिक्षकांसह सहसचिव मिलिंद उमराणी आदी उपस्थित होते.
विद्यालयाचे प्राचार्य मनोहर लेंडे यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी कैलास एलमामे, विनय सावंत, सरपंच गणपत देशमुख, भगवान ठोंबरे, मीनानाथ मुर्तडक आदींनी विशेष परिश्रम घेतले.