भीमा कोरेगावला जाणारच - आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 06:06 AM2018-12-22T06:06:15+5:302018-12-22T06:06:55+5:30
भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.
अहमदनगर : भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला आम्ही जाणार असून आम्हाला कोणी रोखू शकणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिला.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारीला कुणाला सभा घेता येणार नाही, या सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या विधानावर ते म्हणाले, तो बिनडोक आहे़ तो कधी तेथे गेला नाही़ त्यामुळे त्याला भीमा कोरेगाव येथील परिस्थिती माहिती नाही़
संसदेत कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले असते तर ते न्यायालयात टिकले असते़ मात्र राज्य सरकारने मनमानी पद्धतीने आरक्षण देऊन मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावले आहे़ निवडणुकीतून याची कटूता नक्कीच बाहेर पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
रामदास आठवलेंनी पाच कोटी द्यावेत
रामदास आठवले यांनी लवकरच सर्वांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा होतील, असे विधान केले होते. त्यावर आंबेडकरांनी १५ लाख रुपये देण्यापेक्षा आठवलेंनी आपल्याला पाच कोटी रुपये दिले तर किमान निवडणुकीचा खर्च निघेल, असा टोला लगावला.