आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 12:00 PM2021-01-18T12:00:57+5:302021-01-18T12:02:35+5:30

पाथडीर् तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने ५० वषार्पासूनची सत्ता कायम राखली आहे. ९ पैकी पाच जागा गिते यांच्या गटाने मिळविल्या आहेत. 

In the ideal village Lohsar, Anil Gite's dominance is unaffected | आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित

आदर्श गाव लोहसरमध्ये अनिल गिते यांचेच वर्चस्व अबाधित

करंजी : पाथडीर् तालुक्यातील आदर्शगाव लोहसर ग्रामपंचायतीत राज्य सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गिते यांच्या गटाने ५० वषार्पासूनची सत्ता कायम राखली आहे. ९ पैकी पाच जागा गिते यांच्या गटाने मिळविल्या आहेत. 

लोहसर ग्रामपंचायतीत अनिल गिते यांना सुखदेव गिते यांच्या पॅनलने आव्हान दिले होते. यावेळी मोठी चुरशीची निवडणूक झाली. यात अनिल गिते यांना पाच जागांवर समाधान मानावे लागले. अनिल गिते व त्यांच्या  पत्नी हिराबाई गिते हे दोघेही विजयी झालेे आहेत. अनिल गिते यांच्या घरात गेल्या ५०वषार्पासूनची सत्ता आहे. ती  त्यांनी वेळीही अबाधित राखली आहे.

तर सातवड ग्रामपंचायतीत प्राजक्त तनपुरे-मोनिका राजळे गटाविरुध्द करडिले गटात लढत झाली. यात ७ पैकी तनपुरे-राजळे गटाला ६ जागा मिळाल्या तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. राजू पाठक व त्यांच्या पत्नी  मिराबाई पाठक विजयी झाल्या.

Web Title: In the ideal village Lohsar, Anil Gite's dominance is unaffected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.