गडाख भाजपात असते तर ‘शनैश्वर’वर प्रशासक नसता - रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 11:09 AM2018-06-22T11:09:41+5:302018-06-22T11:09:51+5:30

गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता.

If Gadak was a BJP, there would be no administrator at 'Shaneshwar' - Ramdas Kadam | गडाख भाजपात असते तर ‘शनैश्वर’वर प्रशासक नसता - रामदास कदम

गडाख भाजपात असते तर ‘शनैश्वर’वर प्रशासक नसता - रामदास कदम

भाळवणी : गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता. शासनाला भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने शासनाने देव, देवतांनाही राजकारणातून सोडले नाही, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.
पारनेर तालुक्यातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्या पुढाकाराने तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे गुरुवारी भाळवणी येथे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, महिला आघाडीच्या नेत्या आमदार नीलम गोºहे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, समन्वयक विश्वनाथ नेरूरकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार विजय औटी होते.
पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, फक्त तालुक्यापुरतेच शिबिराचे आयोजन न करता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशी शिबिरे घेतली जावीत. पैशाच्या जोरावर धनदांडग्यांचे राजकारण जास्त टिकत नाही. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्ते करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केले.
खासदार राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ५२ वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना करुन मराठी बांधवांसाठी विशेष करुन मुंबईकर मराठी बांधवांसाठी त्यांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.
पारनेरचा प्रत्येक मुंबईकर शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. नगर शहरात दोन शिवसेना कार्यकर्त्यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यातील खरे गुन्हेगार अजूनही मोकाटच आहेत. जे पकडले त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही राऊत यांनी केली.


विखे द्विधा मनस्थितीत- राऊत
राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे कोणत्या पक्षात जावे या विचारात असून ते सध्या व्दिधा मन:स्थितीत आहेत. शिवसेनेची ताकद शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वातून दिसत असल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची शिवसेनेशी युतीसाठी मनधरणी सुरू आहे. सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाºया शासनाला चार वर्षे पूर्ण होऊनही अद्यापही शासन गप्पच असल्याचे खा. राऊत म्हणाले.

दुपारच्या चर्चासत्रात आमदार नीलम गोºहे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. आमदार विजय औटी यांनी आभार मानले
शिबिरास जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाळवणीच्या सरपंच लीलाबाई रोहोकले, ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे, पाडळीचे सरपंच हरिष दावभट, भाळवणीचे उपसरपंच संदीप ठुबे, तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

Web Title: If Gadak was a BJP, there would be no administrator at 'Shaneshwar' - Ramdas Kadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.