त्रास दिल्यास कारवाई करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:19 AM2021-02-14T04:19:58+5:302021-02-14T04:19:58+5:30
तांदूळवाडी गावातील तुळजा भवानी मंदिर परिसरातील पाच ते सहा कुटुंबाच्या घरांवर गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी दगडफेक ...
तांदूळवाडी गावातील तुळजा भवानी मंदिर परिसरातील पाच ते सहा कुटुंबाच्या घरांवर गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी दगडफेक होण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी हा प्रकार अत्यंत चुकीचा असून हा प्रकार थांबला गेला पाहिजे, अशी भूमिका घेतली. तसेच संशयित व्यक्तीचा शोध घेऊन समज देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी सदर ठिकाणी गावात फिरून पाहणी केली. नागरिकांच्या घरांवर विनाकारण दगडफेक केली तर त्या व्यक्तीचा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.
यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्करराव पेरणे, बाजार समितीचे संचालक शरदराव पेरणे, उपसरपंच बाळासाहेब पेरणे, विनित धसाळ, चेअरमन गहिनीनाथ पेरणे, श्यामराव पेरणे, शिवाजी खडके, कानिफनाथ धसाळ, केशव पेरणे, भगवान महाराज मोरे, संजय मोरे, शांताराम पेरणे, बाळासाहेब पेरणे, भाऊसाहेब गंगाधर पेरणे, मच्छिंद्र चव्हाण, प्रसाद पेरणे, अजिंक्य धसाळ, एकनाथ धसाळ, पांडुरंग पेरणे, साईदास मगर, संजय धसाळ, डॉ. मच्छिंद्र मोरे उपस्थित होते.