कोविड सेंटर झाल्यास आंदोलन छेडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:20 AM2021-04-25T04:20:55+5:302021-04-25T04:20:55+5:30
कर्जत : शहरातील प्रभातनगर परिसरात काेविड सेंटर सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा येथील नागरिकांनी मुख्याधिकारी, तहसील प्रशासनाला ...
कर्जत : शहरातील प्रभातनगर परिसरात काेविड सेंटर सुरू केल्यास तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा येथील नागरिकांनी मुख्याधिकारी, तहसील प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे शहरातील प्रभातनगर येथे कोविड सेंटर सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अशी माहिती येथील रहिवाशांना मिळाली. त्यानंतर प्रभातनगर येथील रहिवाशांची बैठक झाली. प्रभातनगर हा रहिवासी असलेला भाग आहे. यामुळे या परिसरात खासगी इमारतीत किंवा कोणत्याही मंगल कार्यालयात कोरोनाचे कोविड सेंटर सुरू करू नये, असा बैठकीत सूर निघाला. या परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत चार जण दगावले आहेत. त्यामुळे अगोदरच यामुळे भागातील रहिवासी भयभीत झाले आहेत. त्यामुळे येथे कोविड सेंटर सुरू करू नये असे निवेदनात म्हटले आहे.
या मागणीचे निवेदन आमदार रोहित पवार, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळेे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना देण्यात आले. त्यानंतर प्रभातनगर हा रहिवासी भाग आहे. येथे कोविड सेंटर सुरू केले जाणार नाही, अशी ग्वाही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली.
या निवेदनावर उत्तम खराडे, सूर्यभान सुद्रिक, भाऊसाहेब शेळके, दादासाहेब थोरात, शरद म्हेत्रे, धनाजी निकम, संपत चौधरी, सुनील भोसले, प्रमोद शिंदे, प्रसाद कानगुडे, बाबूशाम पवार आदींच्या सह्या आहेत.