सावरकरांना भारतरत्न दिला तर क्रांतीकारकांच्या बलिदानाचा अपमान ठरेल-कन्हैयाकुमार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:00 PM2019-10-17T13:00:13+5:302019-10-17T13:00:38+5:30
अहमदनगर : इंग्रजांकडे माफी मागणा-या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणा-या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल़. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे़. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नये, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़.

कन्हैयाकुमार म्हणाले, महात्मा गांधीजींच्या हत्येमध्ये ज्या सावरकांराचा सहभाग होता, त्यांना भारतरत्न देण्याचा संकल्प करणारे भाजपा सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे़. या सरकारच्या विरोधात बोलणारे पत्रकार, कलाकार, विद्यार्थी यांना दोषी ठरवून त्यांचा आवाज दाबला जात आहे़. सत्ताधारी पैसा कमवित आहेत. तर काही नेते पक्षांतर करून स्वत:कडील पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़. सरकारी संस्थांचा गैरवापर करून ईडीची भीती दाखविली जात आहे़. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांचा बाहू करून सध्या महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे़. धार्मिक आणि इतर भावनिक प्रश्न उपस्थित करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे़. सत्ताधारी देशात सध्या इंग्रजांची नीती वापरून वाद घडवित आहेत़.
देशासह महाराष्ट्रातील जनतेने आता विरोधी पक्ष काय करतोय यावर विचार न करता लोकशाही वाचविण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे़ जनतेच्या जनआंदोलनातूनच पर्याय तयार होणार आहेत़. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले किती आश्वासने पूर्ण केले हे त्यांना विचारण्याची गरज आहे़. पीएमसी बँक बुडाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार आत्महत्या करीत आहेत़. सरकार मात्र काही करायला तयार नाही, अशी टीका कन्हैयाकुमार यांनी केली़.