उमेदवारी मिळत असेल तर जय श्रीराम.. अन्यथा म्हणा रामराम...! श्रीगोंद्यात नागवडे समर्थकांच्या भावना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 06:25 PM2019-09-28T18:25:23+5:302019-09-28T18:26:06+5:30

भाजपाचे नेते आपणास श्रीगोंदा मतदारसंघात आमदारकीची उमेदवारी देत असतील तर जय श्रीराम म्हणा.. उमेदवारी मिळत नसेल रामराम सांगा... अशी अंतर्मनातील भावना नागवडे समर्थकांनी व्यक्त केली आहे. 

If you are getting the candidature, Jai Shriram .. Otherwise say, Ramram! Sense of supporters of Nagavade in Shrigondi | उमेदवारी मिळत असेल तर जय श्रीराम.. अन्यथा म्हणा रामराम...! श्रीगोंद्यात नागवडे समर्थकांच्या भावना 

उमेदवारी मिळत असेल तर जय श्रीराम.. अन्यथा म्हणा रामराम...! श्रीगोंद्यात नागवडे समर्थकांच्या भावना 

श्रीगोंदा : भाजपाचे नेते आपणास श्रीगोंदा मतदारसंघात आमदारकीची उमेदवारी देत असतील तर जय श्रीराम म्हणा.. उमेदवारी मिळत नसेल रामराम सांगा... अशी अंतर्मनातील भावना नागवडे समर्थकांनी व्यक्त केली आहे. 
नागवडे कारखाना परिसरात शनिवारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राजकीय घडामोडींवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. स्थानिक पातळीवर आम्ही माजीमंत्री बबनराव पाचपुते गटाशी झुंज देण्याचे काम केले. आमचे स्थानिक पातळीवर त्यांच्याशी जुळणार नाही अशी परिस्थिती आहे. तरी तुम्ही कोणताही निर्णय घ्या. आम्ही तुमच्या बरोबर राहू. पण आपल्या हिताचा निर्णय घ्या. यात आपले भले होईल. त्यावर राजेंद्र नागवडे यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही, असे कार्यकर्त्यांना सांगितले. 
 हर्षवर्धन पाटील यांनी खासदार डॉ.सुजय विखे, राजेंद्र नागवडे यांच्यात काही दिवसापूर्वी बैठक घडवून आणली होती. त्यानंतर राजेंद्र नागवडे हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात आले. विखे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांशी चर्चा करून नागवडे यांचा भाजपात प्रवेश करण्यासाठी विखेंनी व्यूहरचना आखली आहे. यासंदर्भात नागवडे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. 

Web Title: If you are getting the candidature, Jai Shriram .. Otherwise say, Ramram! Sense of supporters of Nagavade in Shrigondi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.