तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:08 AM2019-01-04T11:08:44+5:302019-01-04T11:11:03+5:30

महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते.

If you do not give 300 crores, then Damanena's city bandhani: Pahar organization aggressor | तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक

तीनशे कोटी न दिल्यास दानवेंना शहरबंदी : प्रहार संघटना आक्रमक

अहमदनगर : महापालिका निवडणूक प्रचारात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपला सत्ता दिली तर शहर विकासासाठी ३०० कोटींचा निधी देण्याचे आश्वासन दिले होते. आता मनपात भाजपची सत्ता आली आहे, त्यामुळे त्यांनी ३०० कोटींचा निधी द्यावा, अन्यथा दानवेंना शहरबंदी करू, असा इशारा प्रहार जनशक्ती संघटनेने दिला आहे.
दानवे शुक्रवारी नगर दौऱ्यावर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी,अजित धस, दत्ताभाऊ झरेकर यांनी गुरूवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले असून, त्याची प्रत निवासी उपजिल्हाधिकाºयांना दिली. पत्रात त्यांनी म्हटले आहे की, दानवे यांनी मनपा निवडणूक प्रचारात शहराला ३०० कोटींचे आश्वासन दिले होते. परंतु लोकांचा भाजपवर विश्वास नसल्याने त्यांना मनपात केवळ १४ जागा मिळाल्या. तरीसुद्धा राष्ट्रवादी व बसपाच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठी पदाची तमा न बाळगता भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला. त्यामुळे मनपात महापौर, उपमहापौर दोन्ही पदे भाजपला मिळाली. त्यामुळे दानवे यांनी आपल्या आश्वासनाप्रमाणे नगर दौºयावर येताना ३०० कोटींच्या निधीचे पत्र आणावे व ते महापालिकेकडे वर्ग करावे, अन्यथा दानवे यांच्या गाडीसमोर आडवे पडून त्यांना शहरबंदी करू, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

दानवे आज नगरमध्ये
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याचे संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे शुक्रवारी नगरमध्ये दाखल होत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पदाधिकाºयांशी संवाद साधणार आहेत. शुक्रवारी (दि.४) दुपारी चार वाजता दिल्ली गेट येथील दीक्षित मंगल कार्यालयात जिल्ह्यातील निवडक पदाधिकाºयांना ते लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी दिली. महापालिकेच्या प्रचाराचा नारळ वाढविण्यासाठी दानवे नगरमध्ये आले होते.
आता सत्तास्थापनेनंतर ते शहरात येणार असल्याने ते काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेत सत्ता स्थापन केल्याने त्यावर ते काय भाष्य करणार, याचीही उत्सुकता आहे.

Web Title: If you do not give 300 crores, then Damanena's city bandhani: Pahar organization aggressor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.