हिंमत असेल तर टोल नाके सुरू करूनच दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:38 AM2021-03-04T04:38:49+5:302021-03-04T04:38:49+5:30

घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे कमी करण्यासाठी यापूर्वी कायदेशीर हरकती घेण्यात आल्या आहेत. खोटा पाहणी अहवाल तयार करून हॉटेल, दुकाने व ...

If you have the courage, start by showing the toll booths | हिंमत असेल तर टोल नाके सुरू करूनच दाखवा

हिंमत असेल तर टोल नाके सुरू करूनच दाखवा

घरपट्टी, पाणीपट्टी, गाळाभाडे कमी करण्यासाठी यापूर्वी कायदेशीर हरकती घेण्यात आल्या आहेत. खोटा पाहणी अहवाल तयार करून हॉटेल, दुकाने व अन्य व्यवसाय सुरू असल्याचे लेखी कळविले. शिर्डीच नव्हे तर संपूर्ण देश कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असताना शिर्डी नगरपंचायतच्या सत्ताधाऱ्यांना व त्यांच्या नेत्यांना शिर्डीत व्यवसाय सुरू असल्याचे कसे दिसले, असा प्रश्न उपस्थित करीत सत्तेच्या प्रेमापोटी नेते धृतराष्ट्रासारखे आंधळे झाल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. सक्तीची करवसुली व दंडवसुलीने नागरिकांवर आत्महत्येची वेळ आली आहे.

त्यातच आता २ मार्च रोजी खोटी सर्वसाधारण सभा दाखवून भक्तांकडून टोलनाक्यांवर करवसुलीचा निर्णय घेण्यात आला आहे. पैसे वसूल करणे एवढाच सत्ताधारी व त्यांच्या नेत्यांचा एकमेव उद्देश असून, शिवसेना याला तीव्र विरोध करील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी राहुल दिगंबर गोंदकर, सुनील बारहाते, वीरेश गोंदकर, राजेंद्र कोते, नवनाथ विश्वासराव, अनिल पवार, चंद्रकांत गायकवाड, मच्छिंद्र गायके, सोमनाथ महाले, अमर अग्रवाल, हरिराम रहाणे, प्रकाश भालेराव, सहदेव बढे, दत्तात्रय भालेराव, अक्षय तळेकर, सुयोग सावकारे, विशाल बागुल, वसीम शेख, सलीम तांबोळी, शुभम पठारे, मयूर शेर्वेकर, आदी उपस्थित होते.

( ०३ शिर्डी)

Web Title: If you have the courage, start by showing the toll booths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.