शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतल्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:20 AM2021-05-24T04:20:23+5:302021-05-24T04:20:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, ...

If you take more money from farmers | शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतल्यास

शेतकऱ्यांकडून जास्त पैसे घेतल्यास

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते व औषधे खरेदीची पावती विक्रेत्यांकडून घ्यावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे यांनी केले.

कापसे यांनी शनिवारी शहरातील मार्केटयार्ड येथे कृषी सेवा केंद्रांची पाहणी करून दुकानदारांना नियमांचे पालन करण्याबाबत सूचना केल्या. यावेळी तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, मंडल कृषी अधिकारी टकले उपस्थित होते. कापसे म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्वतः दुकानदाराने व खरेदीदाराने मास्क लावावा, विक्री केंद्रात सॅनिटायझर उपलब्ध करून देत त्याचा स्वतः तसेच खरेदीदाराने वापर करावा, सुरक्षित अंतराचे पालन करावे, केंद्रासमोर गर्दी होणार नाही, यासाठी उपाययोजना कराव्यात, सुरक्षित अंतर राहण्यासाठी मार्किंग करणे आवश्यक आहे. वरील बाबींचे पालन होत नसल्यास जिल्ह्यातील निरीक्षकांकडून अचानक भेटी देऊन कारवाई केली जाईल. खतांच्या गोण्यांवर छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने खते विकल्यास विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल. शेतकरी गटामार्फत एकत्रित निविष्ठांची मागणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवून निविष्ठा बांधावर पोहोच करण्याबाबत कृषी सेवा केंद्रचालकांनी पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.

Web Title: If you take more money from farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.