पैसेच कमवायचे तर मंत्री कशाला ठेकेदार व्हा; सुजय विखे यांचा महाविकास आघाडीला टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 04:20 PM2020-01-13T16:20:16+5:302020-01-13T16:20:47+5:30
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे राजकीय गुरू आहेत. त्यांनी जे सांगितलेला आहे, ते खर आहे. हे एकीकडे सामान्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगतात. पण मलईदार खात्यावरून रोज भांडत आहेत. पैसे कमवायचे तर मंत्री होण्यापेक्षा ठेकेदार हा असा टोला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना लगावला आहे.
अहमदनगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे माझे राजकीय गुरू आहेत. त्यांनी जे सांगितलेला आहे, ते खर आहे. हे एकीकडे सामान्यांसाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगतात. पण मलईदार खात्यावरून रोज भांडत आहेत. पैसे कमवायचे तर मंत्री होण्यापेक्षा ठेकेदार हा असा टोला महाविकास आघाडीच्या मंत्र्यांना लगावला आहे.
अहमदनगर महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीनंतर खासदार विखे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विख पुढे म्हणाले, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याच्याशी मी सहमत आहे. कुठलाही वैचारिक राजकारणी असेच म्हणेन. कारण ही तिन्ही पक्ष जनतेच्या सेवेसाठी नाहीतर स्वत:च्या स्वार्थासाठी एकत्र आलेली आहेत. ते जरी एकत्र आले असले तरी तिन्ही पक्षातील खालच्या स्थरातील कार्यकर्ते अजून एकत्र आलेले दिसत नाही. हे तितकेच खरे आहे. मंत्र्यांच्या कामावरुन त्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे. पण इथे मात्र महत्त्वाच्या खात्यावरुनच नाराजी नाट्य सुरू आहे. ते सातबारा कोरा करू, असेही सांगत होते. रोज नवीन जीआर येत आहेत. एखाद्या प्रश्नांवर या तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले नाही तर त्यातून अनेक निर्माण होऊ शकतात, असेही ते म्हणाले.