विसापूर येथे अवैध व्यवसाय तेजीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:17+5:302021-05-09T04:22:17+5:30
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र अवैध व्यवसायाला या काळात तेजी ...
विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र अवैध व्यवसायाला या काळात तेजी आली आहे.
राज्य शासनाचे लॉकडाऊन व श्रीगोंदा तालुक्यातील दहा दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे दवाखाने व मेडिकल या सेवा वगळता जवळपास सर्व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. लोकांना कटिंग करायची झाली तर सलून बंद आहेत. विद्युत दिवा गेला तर इलेक्ट्रॉनिक्स दुकाने बंद आहेत. किराणा व कृषी सेवा केंद्र बंद आहेत. असे असताना जुगार, मटका व दारू हे अवैध व्यवसाय मात्र चोरीछुपे जोरात सुरू आहेत. विसापूर येथे तर सर्व अवैध धंदे सरकारी जागेवर सुरू आहेत. काही लोक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर टपऱ्यांमध्ये, काही लोक रेल्वेच्या मोकळ्या जागेत, तर काही शासनाच्याच इतर जागेवर जुगार, मटका व दारूचे अड्डे टाकून बसले आहेत.