बेकायदेशीर रॉकेल वाहतूक प्रकरणी दहा दिवसांनंतर केला गुन्हा दाखल

By Admin | Published: May 6, 2017 02:56 PM2017-05-06T14:56:39+5:302017-05-06T14:56:39+5:30

अभिजीत किसन महाशिकारे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात अखेर दहा दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला़

Illegal kerosene transport case filed after ten days | बेकायदेशीर रॉकेल वाहतूक प्रकरणी दहा दिवसांनंतर केला गुन्हा दाखल

बेकायदेशीर रॉकेल वाहतूक प्रकरणी दहा दिवसांनंतर केला गुन्हा दाखल

आॅनलाइन लोकमत
भेंडा (अहमदनगर), दि़ ५ - रेशनवरील रॉकेल खुल्या बाजारा विक्रीसाठी नेताना पकडण्यात आलेल्या अभिजीत किसन महाशिकारे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात अखेर दहा दिवसांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला़
तरवडी (ता. नेवासा) येथील अभिजित किसन महाशिकारे हा विना क्रमांकाच्या वाहनातून २५ एप्रिल रोजी रात्री कुकाण्याकडे कांद्याच्या गोण्याआड रॉकेलने भरलेली लोखंडी टाकी घेऊन जात असताना पोलीस पाटील विकास भागवत यांनी पकडून नेवासा पोलिसांच्या ताब्यात दिले होते. लोखंडी टाकीतील ३९६१ रुपये ५० पैसे किमतीचे १९० लिटर रॉकेल वाहनासह पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतरही तब्बल दहा दिवस याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदविला नव्हता़ याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर पुरवठा निरीक्षक बी. एन. धंडोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नेवासा पोलिसांनी महाशिकारे याच्यावर गुन्हा नोंदविला़

Web Title: Illegal kerosene transport case filed after ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.