जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस नगरमध्ये महिलांनी मारले जोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 11:19 AM2017-11-07T11:19:03+5:302017-11-07T11:22:20+5:30

अहमदनगर : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून सोमवारी ...

In the image of Water Resources Minister Girish Mahajan, women were killed in the city | जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस नगरमध्ये महिलांनी मारले जोडे

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस नगरमध्ये महिलांनी मारले जोडे

अहमदनगर : जलसंपदामंत्रीगिरीश महाजन यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा महिला राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस जोडे मारून सोमवारी निषेध करण्यात आला.
राज्याचे जलसंपदमंत्री महाजन यांनी महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा नगरमध्ये पडसाद उमटले. महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा मंजूषा गुंड व शहर-जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे यांच्यासह महिलांनी जुने बसस्थानक येथे महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला. आंदोलनात किरण कटारिया, अरुणा बोरा, शारदा लगड, राजश्री मांढरे, अनिता हांडे, लता गायकवाड, रेखा भोईटे, मनीषा आठरे, अनिता दुरावे, उषा मकासरे, निर्मला जाधव, शीतल राऊत, कुसुम शिंदे, प्रीती संचेती आदीं महिलांचा सहभाग होता.

Web Title: In the image of Water Resources Minister Girish Mahajan, women were killed in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.