तातडीने रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा : विखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 01:06 PM2021-04-10T13:06:46+5:302021-04-10T13:07:19+5:30

जिल्ह्यासाठी तातडीने या इंजेक्शनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Immediate supply of Remedesivir injection: Vikhe's demand to CM | तातडीने रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा : विखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तातडीने रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा करावा : विखे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यासह राहाता तालुक्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. इजेक्शन मिळत नसल्‍याच्या कारणाने कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी अडचण लक्षात घ्यावी. जिल्ह्यासाठी तातडीने या इंजेक्शनचा पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. विखे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांना जिल्ह्यातील गंभीर परिस्थितीचे वास्तव पत्रातून विशद केले आहे.

रेमडीसिवीर इंजेक्शनची मागणी वाढली असताना सुध्दा उपलब्ध होत नाही. या इंजेक्शनचा साठा करून ठेवला आहे का? याबाबत कोणतीही स्पष्टता होवू शकत नसल्याने या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याच्या घटना समोर आल्याने रूग्‍णांच्या नातेवाईकांची होत असलेली वणवण आणि लूटमार थांबविण्यासाठी शासनानेच जिल्ह्यात आणि राहाता तालुक्यात रेमडीसिवीर इंजेक्शनचा साठा त्वरीत उपलब्ध करुन द्यावा. 

जिल्ह्यात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, हॉस्पीटल मध्ये बेड, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर सुध्दा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. हॉस्पिटल मधून आकारण्यात येत असलेली बील, रूग्णालय व्यवस्थापनाकडून देण्यात येत असलेली अमानवी वागणूक असे संतापजनक प्रकार घडत असताना सुध्दा प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याने याबातही आपण व्यक्तिगत लक्ष घालून जनतेला दिलासा देण्यासाठी संबधिताना सूचना द्याव्यात, असे पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Immediate supply of Remedesivir injection: Vikhe's demand to CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.