अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, विक्रेते यांचे तत्काळ लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:19 AM2021-05-23T04:19:49+5:302021-05-23T04:19:49+5:30
लसीकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांचे लसीकरण करावे. पत्रकारांना वृत्तांकनासाठी कोविड सेंटर, ...
लसीकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांचे लसीकरण करावे. पत्रकारांना वृत्तांकनासाठी कोविड सेंटर, विविध कार्यालयांबरोबरच सर्वत्र जावे लागते. त्यामुळे प्राधान्याने पत्रकार बांधवांचे लसीकरण करण्यात यावे. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवेचा अविभाज्य भाग असलेले वृत्तपत्र विक्रेते, औषध विक्रेते, किराणा दुकानदार, दूध संकलन चालक व त्यांचे कर्मचारी, बँक व पतसंस्था यांचे कर्मचारी, कृषी सेवा केंद्र चालक, सफाई कर्मचारी सर्वांचा फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश करून वरील सर्वांचे प्राधान्याने लसीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी तहसीलदार फसिओद्दीन शेख व प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात येऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.