शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित ५० हजार रुपये जमा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:18 AM2021-03-20T04:18:39+5:302021-03-20T04:18:39+5:30

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जामखेड- नगर रस्त्यावरील पक्ष कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी ...

Immediately deposit Rs. 50,000 in the farmer's account | शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित ५० हजार रुपये जमा करा

शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित ५० हजार रुपये जमा करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जामखेड- नगर रस्त्यावरील पक्ष कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, युवक तालुकाध्यक्ष राहुल पवार, प्रहारचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, जिल्हा संघटक ॲड.ऋषीकेश डुचे, संघटना प्रमुख हनुमान उगले, तालुका प्रसिद्धीप्रमुख कृष्णा डुचे, भीमराव पाटील, गणेश हागवणे, मंगेश मुळे, भाऊ डोके, बंडू बहिर, आबा जाधव, शंकर जाधव, चंदू कार्ले, गणेश परकाळे, वैभव कार्ले, मोहन मदने, बाबु साळुंखे, विशाल कोरडे, योगेश मुळे, बुवा दहीकर, बालाजी आजबे, प्रदीप कात्रजकर, सुरज मुळे, श्रीधर मुळे, शिवराज वीटकर, परकाळे दाजी आदी उपस्थित होते

मंगेश आजबे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने विधानसभा अधिवेशनात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये म्हणून घोषणा केली व आठच दिवसांत घोषणा मागे घेतली. शेतकऱ्यांचे व घरगुती तोडलेले वीज कनेक्शन तात्काळ जोडा व लॉकडाऊन काळातील वाढीव वीजबिल माफ करण्याची मागणी केली. दोन लाख रुपयांची कर्जमाफी करताना जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली, ते कधी देणार. पेट्रोल व डिझेलचे भाव वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार यांनी समन्वय ठेवून दरवाढ कमी करावी, केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेले काळे कायदे मागे घ्यावे, सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन कार्यवाही करावी, अशा मागण्या केल्या. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुनील थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांनी रहदारी सुरळीत करीत चोख बंदोबस्त ठेवला.

...............

आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर

प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले म्हणाले की, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी आम्ही सत्तेत असलो तरी शेतकऱ्यांच्या बरोबर असून सत्तेला लाथ व अन्यायाला साथ हे आमच्या संघटनेचे प्रथम कर्तव्य असल्याने आंदोलनात सहभागी असल्याचे सांगितले. यावेळी सुनील लोंढे,शहराध्यक्ष नय्युम शेख आदींनी मार्गदर्शन केले.

........

फोटो आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना तालुकाध्यक्ष मंगेश आजबे.

Web Title: Immediately deposit Rs. 50,000 in the farmer's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.